spot_img

T20 World Cup : पाकिस्तानी युट्यूबरने दिली ICC च्या ऑफिसला बॉम्बने उडवण्याची धमकी

spot_img

टी 20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup) सुरू होण्यापूर्वीच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यानंतर ICC ने त्यांना कडक इशारा दिला होता. मात्र, आता या वादात एका पाकिस्तानी (Pakistan) युट्यूबरने उडी घेतली असून, त्याने थेट आयसीसीचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्याच्या या धमकीमुळे सोशल मीडियावर चांगली खळबळ उडाली, इतकच नाही तर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्सलान नासीर नावाच्या एका पाकिस्तानी युट्यूबरने 15 मिनिटांचा व्हिडीओ केला. हा व्हिडीओमध्ये कॉमेडी आणि क्रिकेट रिव्ह्यूच्या नावाखाली पोस्ट करण्यात आला असला, तरी त्यात तो जे बोलला आहे ते आक्षेपार्ह आहे. यामध्ये त्याने आयसीसी आणि BCCI वर टीका केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे.15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना नियोजित आहे. मात्र, पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. यावर आयसीसीने स्पष्ट केले आहे की, जर पाकिस्तानने सामना खेळण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर मोठा दंड आकारला जाईल आणि भविष्यात त्यांच्यावर बंदीही घातली जाऊ शकते. या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यातूनच अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ