spot_img

T20 World Cup : टी20 वर्ल्डकप संघात मराठमोळ्या खेळाडूंना मिळाली संधी!

spot_img

टी20 वर्ल्डकप (T20 World Cup) सुरू व्हायला अवघा आठवडा उरला असताना अमेरिकेच्या संघाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या अमेरिकेच्या या संघात बहुतांश खेळाडू हे मुळचे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे आहेत, जे इथे कामानिमित्त स्थायिक झाले आहे. तसेच कर्णधार पदाची जबाबदारी पुन्हा एकदा मुळचा गुजरातचा असलेला फलंदाज आणि विकेटकिपर मोनांक पटेलच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या संघात दोन मराठमोळे खेळाडू देखील आहेत.

येत्या 7 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. अमेरिकेचा पहिला सामना यजमान भारताविरुद्ध खेळणार आहे. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मोनांक पटेल पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल. 32 वर्षीय खेळाडूने 2024 च्या टी20 विश्वचषकात अमेरिकेचे नेतृत्वही केले होते. अमेरिकेचा हा सलग दुसरा टी20 विश्वचषक असेल. यापूर्वी, २०२४ मध्ये, संघाने पदार्पणाच्या स्पर्धेत पाकिस्तानला हरवून सुपर ८ मध्ये पोहोचून इतिहास रचला होता. संघात भारतीय, पाकिस्तानी आणि श्रीलंकेच्या वंशाच्या खेळाडूंचाही समावेश आहे. संघात 2024 च्या टी20 विश्वचषकात खेळलेल्या 10 खेळाडूंचा समावेश आहे.जेसी सिंग, अँड्रीस गॉस, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, हरमीत सिंग, नोस्थुश केंजीगे, शॅडली व्हॅन शाल्कविक, सौरभ नेत्रावलकर आणि अली खान यासारखे अनुभवी खेळाडू संघात परतले आहेत. विशेषतः २०२४ च्या विश्वचषकात अमेरिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा अँड्रीस गॉसनेही सहा विकेट्स घेतल्या.

USA T20 विश्वचषक 2026 संघ: मोनांक पटेल (C), जेसी सिंग (VC), अँड्रिज गॉस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कामला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्तुश केंजिगे, शेडली व्हॅन शाल्क्विक, मोहम्मद अली खान, मोहम्मद अली खान, मोहम्मद खान.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ