Jio, Airtel आणि Vi चे ₹44 पासून सुरू होणारे प्लान; वेगळं OTT सब्सक्रिप्शन नको, एकाच रिचार्जमध्ये लाईव्ह क्रिकेट
T20 वर्ल्ड कपची क्रिकेटची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र प्रत्येकवेळी टीव्हीसमोर बसणं शक्य नसतं. अशावेळी स्मार्टफोनवरच लाईव्ह मॅच पाहण्याचा सोपा पर्याय उपलब्ध आहे. मोबाईलवर T20 वर्ल्ड कपचे थेट सामने पाहण्यासाठी JioHotstar मोबाईल सब्सक्रिप्शन आवश्यक आहे. मात्र त्यासाठी वेगळं OTT सब्सक्रिप्शन खरेदी करण्याची गरज नाही.
Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) यांनी JioHotstar सब्सक्रिप्शनसह खास डेटा प्लान्स सादर केले आहेत. केवळ छोटासा डेटा रिचार्ज करून संपूर्ण टूर्नामेंटची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येते. विशेष म्हणजे काही प्लानची किंमत फक्त ₹44 पासून सुरू होते.
Jio चे स्वस्त क्रिकेट डेटा व्हाऊचर
Jio ने क्रिकेटप्रेमींसाठी खास डेटा व्हाऊचर आणले आहेत.
₹100 प्लान: 5GB हाय-स्पीड डेटा + 30 दिवसांची वैधता आणि JioHotstar मोबाईल सब्सक्रिप्शन
₹195 प्लान: 15GB डेटा + 90 दिवसांची वैधता आणि 90 दिवसांचे सब्सक्रिप्शन
हे डेटा व्हाऊचर वापरण्यासाठी आधीपासून सक्रिय बेस प्लान असणं आवश्यक आहे. संपूर्ण वर्ल्ड कप आणि आगामी मालिकांसाठी हा किफायतशीर पर्याय मानला जात आहे.
Vi (Vodafone Idea) चे प्लान
Vi कडून वेगवेगळ्या बजेटमधील प्लान्स उपलब्ध आहेत.
₹44 सॅशे प्लान: 1GB डेटा (1 दिवस वैध), पण JioHotstar सब्सक्रिप्शन 30 दिवसांसाठी
₹101 प्लान: 5GB डेटा + 30 दिवसांची वैधता
₹151 आणि ₹169 प्लान: 90 दिवसांची वैधता, 3 महिन्यांचे JioHotstar सब्सक्रिप्शन
जास्त डेटाचे व्हाऊचर घेतल्यास लाईव्ह मॅच चांगल्या क्वालिटीमध्ये पाहता येतात.
Airtel यूजर्ससाठी डेटा + OTT कॉम्बो
Airtel देखील JioHotstar मोबाईल एक्सेससह डेटा अॅड-ऑन पॅक देत आहे.
₹100 प्लान: 6GB डेटा + 30 दिवसांची वैधता आणि JioHotstar सब्सक्रिप्शन
₹195 प्लान: 12GB डेटा + 30 दिवसांची वैधता, JioHotstar सोबत Airtel Xstream Play चा अॅक्सेस
हे सर्व डेटा अॅड-ऑन प्लान असून, वापरासाठी सक्रिय अनलिमिटेड कॉलिंग प्लान आवश्यक आहे.
कोणासाठी कोणता प्लान योग्य?
जे युजर्स फक्त निवडक सामने पाहू इच्छितात, त्यांच्यासाठी कमी किमतीचा डेटा प्लान पुरेसा आहे. मात्र संपूर्ण वर्ल्ड कप आणि पुढील क्रिकेट मालिका पाहण्याचा विचार असेल, तर 90 दिवस वैधतेचे जास्त डेटा असलेले प्लान अधिक फायदेशीर ठरतात. यामुळे स्ट्रीमिंग दरम्यान डेटा संपण्याची किंवा मॅच थांबण्याची चिंता राहत नाही.




