spot_img

T20 World Cup 2026 : T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला धक्का; वेगवान गोलंदाज हर्षित राणा जखमी

spot_img

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वॉर्म-अप सामन्यात गुडघ्याला दुखापत; पहिल्या सामन्याआधी टीमचं टेन्शन वाढलं

T20 वर्ल्ड कप 2026 अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना भारतीय संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. दुखापतींच्या समस्येतून सावरत असतानाच आता वेगवान गोलंदाज हर्षित राणा जखमी झाल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वॉर्म-अप सामन्यात हर्षितला गुडघ्याची दुखापत झाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईत 4 फेब्रुवारी रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 वर्ल्ड कपची वॉर्म-अप लढत पार पडली. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी विजय मिळवला. मात्र या विजयावर हर्षित राणाच्या दुखापतीचं सावट पडलं. सामन्यादरम्यान तो लंगडत चालताना दिसला आणि दोन पावलं चालणंसुद्धा त्याला कठीण जात होतं. मैदानावरील त्याचे फोटो समोर आल्यानंतर टीम मॅनेजमेंटची चिंता अधिकच वाढली आहे.

हर्षित राणाने प्रचंड वेदना सहन करत केवळ एकच ओव्हर टाकली. त्या ओव्हरमध्ये त्याने 16 धावा दिल्या. Sportstarच्या माहितीनुसार, त्या ओव्हरमध्ये त्याला दोन वेळा रन-अप घेऊन थांबावं लागलं. अखेर गुडघा पकडत तो मैदानाबाहेर गेला.

सध्या हर्षित राणाच्या दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र दुखापत गंभीर ठरल्यास टीम इंडियासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. हर्षित राणा हा वेगवान गोलंदाजासोबतच ऑलराऊंडर असल्याने त्याची अनुपस्थिती संघाच्या संतुलनावर परिणाम करू शकते.

याआधीही भारतीय संघातील खेळाडू दुखापतींच्या विळख्यात अडकले आहेत. ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात जखमी झाला होता आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. तो लवकरच फिट होईल, असं सांगितलं जात असलं तरी यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, तिलक वर्मा नुकताच दुखापतीतून सावरून संघात परतला आहे. अक्षर पटेलही बोटाच्या दुखापतीतून बरा झाला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वॉर्म-अप सामन्यात त्याने एक ओव्हरमध्ये केवळ 2 धावा देत 1 विकेट घेतली.

T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना USA विरुद्ध होणार आहे. त्याआधी हर्षित राणाच्या फिटनेसवर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ