इशान किशन आणि रिंकु सिंह संघात कमबॅक; शुबमन गिल आणि जितेश शर्मा वगळले
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या हातात असून उपकर्णधार अक्षर पटेल ठरले आहेत.
संघात शुबमन गिल (Shubham Gill) आणि जितेश शर्माला (Jitesh Sharma) जागा मिळाली नाही, तर इशान किशन (Ishan Kisan) आणि रिंकु सिंगला (Rinku Singh) संघात परतावा मिळाला आहे. बीसीसीआयने हा संघ 20 डिसेंबर रोजी जाहीर केला असून, आयसीसीच्या नियमांनुसार 7 जानेवारीपर्यंत संघात बदल करता येऊ शकतात.
7 जानेवारीनंतरही संघात बदल होऊ शकतो, परंतु त्यासाठी आयसीसीच्या टेक्निकल कमिटीची मान्यता आवश्यक आहे. फक्त गंभीर दुखापती किंवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यासच कोणत्याही खेळाड्याची जागा बदलली जाऊ शकते.
टीम इंडिया:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, रिंकू सिंह.




