Suraj Chavan Wife Sanjana Pregnant : सूरज चव्हाणच्या घरी हलणार पाळणा? संजनाच्या ‘त्या’ पोस्टने सोशल मीडियावर उडाली खळबळ!

spot_img

‘बिग बॉस मराठी ५’ फेम सूरज चव्हाण आणि संजनाच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार? व्हायरल फोटोंमुळे चाहत्यांच्या चर्चांना उधाण

‘बिग बॉस मराठी ५’ चा लाडका विजेता सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आले आहेत. संजनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, चव्हाण कुटुंबात लवकरच ‘चिमुकल्या पाहुण्याचे’ आगमन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये संजनाचा बेबी बंप दिसत असल्याचा दावा चाहत्यांकडून केला जात आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

विशेष म्हणजे, संजनाने या फोटोंसोबत ‘देवकी’ चित्रपटातील एक अतिशय भावूक गाणं आणि “अजून तू माझ्या पोटात आहेस…” असा ओलावा असलेला ऑडिओ जोडला आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नाला काहीच महिने उलटले असताना ही ‘गुड न्यूज’ समोर आल्याने चाहते सुखावले आहेत. मात्र, संजनाने या पोस्टचे कमेंट सेक्शन बंद ठेवल्याने या बातमीबाबत अधिक गूढ निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, या फोटोंबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना हे संजनाच्या डोहाळे जेवणाचे फोटो वाटत आहेत, तर काहींनी हे फोटो ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे बनवलेले असावेत अशी शंका उपस्थित केली आहे. अद्याप सूरज किंवा संजना यांपैकी कोणीही अधिकृतपणे या बातमीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे ही खरंच ‘गुड न्यूज’ आहे की केवळ एक सोशल मीडिया ट्रेंड, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ