Suraj Chavan : राष्ट्रवादीत वाद पेटला; सूरज चव्हाण यांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप

spot_img

मुंबई येथे बोलताना अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

चव्हाण म्हणाले की, या प्रकाराला आता मर्यादा आहेत आणि यापुढे जर बदनामीचे प्रयत्न सुरू राहिले तर त्याला तितक्याच तीव्रतेने उत्तर दिले जाईल. पक्षात कोणी चुकीचे वागल्यास त्यावर कारवाई करण्याचा अधिकार सुनेत्रा पवार यांना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, रोहित पवार यांनी पक्षात फूट पाडण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी मोठी आर्थिक मदत देऊन काही लोकांना कामावर लावल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. काही पदाधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, पक्षाच्या रचनेबाबतही गैरसमज निर्माण केला जात असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. पक्षाच्या संविधानात सुरुवातीपासूनच काही ठराविक फ्रंटल विभाग असल्याचे त्यांनी सांगत, ओबीसी, सामाजिक न्याय किंवा इतर सेल कधीच त्या फ्रंटलचा भाग नव्हते, असे स्पष्ट केले. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ