सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा भन्नाट डान्स होतोय VIRAL
गुलिगत स्टार सूरज चव्हाणचं लव्ह मॅरेज आहे. आपल्या चुलत मामाच्या मुलीशीच सूरज लग्नगाठ बांधणार आहे. दोघेही पुण्यातील सासवडमध्ये आपली लग्नगाठ बांधणार आहे. सूरजंने बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व गाजवलं होतं. झापूक झुपूक स्टार सूरज चव्हाणची (Suraj Chavan) सध्या लग्नसराई सुरू आहे. 29 नोव्हेंबरला सूरज चव्हाण आपल्या मामाची मुलगी संजना (Sanjana) हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. सूरजचं नवं घर बांधून तयार असून आता लग्नानंतर सूरज चव्हाण आपल्या अलिशान घरात बायकोसोबत संसार थाटणार आहे. आता सूरज आणि संजनाच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली असून सध्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ सूरजची होणारी बायको संजनाच्या घरच्या कार्यक्रमाचा आहे. संजनाच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याच सोहळ्याचा हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमात तिनं धमाल डान्ससुद्धा केलाय. या डान्सच्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. घाण्याच्या कार्यक्रमावेळी संजनानं दणक्यात ठेका धरलेला. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. घाणा भरण्याच्या कार्यक्रमासाठी संजनानं हिरव्या रंगाची साडी नेसलेली. त्यासोबत तिनं पारंपरिक दागिने परिधान केलेले. तसेच, केसात गजरा माळलेला. आपल्या लग्नापूर्वीच्या घाणा भरण्याच्या कार्यक्रमासाठी संजनान सुंदर साजश्रृंगार केलेला.




