spot_img

Supriya Sule : पवार कुटुंबाची यंदाची दिवाळी साधेपणात; गोविंदबागेतील उत्सव देखील रद्द

spot_img

काकी भारती पवार यांच्या निधनामुळे सुप्रिया सुळेंनी जाहीर केला निर्णय

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र आनंद, रोषणाई आणि खरेदीची लगबग दिसत आहे. मात्र, यंदा पवार कुटुंबाने सण साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ही माहिती दिली. त्यांच्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार (Bharti Pawar) यांचे अलीकडेच निधन झाले. त्या कुटुंबासाठी मातृतुल्य होत्या, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या दुःखद प्रसंगामुळे पवार कुटुंबाने यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा आणि बारामतीतील गोविंदबाग येथे दरवर्षी होणारा भव्य दिवाळी सोहळा तसेच पाडव्यानिमित्तचा सहृदय भेटीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुप्रिया सुळे यांनी याबाबत एका ट्वीटद्वारे माहिती दिली. त्यांनी लिहिले, “आमच्या काकी सौ. भारती पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आमच्यासाठी आईसमान होत्या. त्यामुळे आम्ही यंदा दिवाळी साजरी करणार नाही. गोविंदबागेतील पारंपरिक कार्यक्रमही यावर्षी होणार नाहीत. सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंदाची दिवाळी लाभो, ही शुभेच्छा.” दरवर्षी पवार कुटुंब बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी एकत्र येऊन उत्साहात दिवाळी साजरी करते. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. पाडव्यादिवशी अनेक कार्यकर्ते आणि हितचिंतक शरद पवार आणि कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबागेत येतात. या भेटींमधून शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, ज्यामुळे हा कार्यक्रम राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतो. पण यंदा हा उत्सव रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ