Supriya Sule On Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया;सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

spot_img

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतर निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता ही निवडणूक प्रत्यक्षात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.

पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्या एक सामान्य मतदार म्हणून बारामतीत मतदान करणार आहेत. तसेच अजित पवार यांच्या गटाकडून प्रचारासाठी निमंत्रण आल्यास त्याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. “शेवटी नातेसंबंध महत्त्वाचे असतात,” असे म्हणत त्यांनी कुटुंबीय संबंधांवर भर दिला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

सुनेत्रा पवार किती मताधिक्याने जिंकतील, याबाबत विचारले असता सुळे यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सुख-समाधानासाठी त्यांनी विठ्ठलाकडे प्रार्थना केली आहे.

निवडणूक बिनविरोध का झाली नाही, या प्रश्नावर त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका करत “हा प्रश्न त्यांनाच विचारावा,” असे सांगितले. राजकारणात सत्ता आणि पैसा येत-जात असतो, मात्र कठीण प्रसंगी कुटुंबच साथ देते, असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ