Supriya Sule : अशोक खरात प्रकरणावरून सुळे-सपकाळ आमनेसामने

spot_img

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. सुळे यांनी सांगितले की, या प्रकरणात राजकारण न करता राज्याच्या हितासाठी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. अंधश्रद्धेविरोधात लढा देणारे नरेंद्र दाभोळकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम आजच्या नेतृत्वाकडून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सुळे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, हे विधान संतापजनक असल्याचे म्हटले. सपकाळ यांनी पुढे असेही सांगितले की, दाभोळकर हत्याकांडातील काही आरोपींना नंतर निर्दोष ठरवण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री कोणत्या दिशेने पावले उचलत आहेत, याबाबत सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

खरात प्रकरणामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा, राजकारण आणि कायद्याच्या अंमलबजावणीवरून राज्यात चर्चा रंगू लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ