spot_img

Supreme Court Hearing On Shivsena  : शिवसेना पक्ष आणि चिन्हा वरील सुनावणी, सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लागले लक्ष

spot_img

तीन वर्षांपासून सुरु असलेल्या सुनावणीला पुन्हा एकदा तारीख आजच्या सुनावणीत निकाल लागेल का, याकडे राज्याचं लक्ष

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाच्या मालकीचं यावर गेली तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. अनेकदा निकाल लागणार असं वाटूनही प्रत्येक वेळी फक्त “पुढील तारीख” अशीच घोषणा होत आली आहे. मागील महिन्यातही असाच अनुभव आला. मात्र, आज म्हणजे 12 डिसेंबरला पुन्हा एकदा सुनावणी होणार असून ठाकरे गटातील नेत्यांना यावेळी तरी निर्णय व्हावा अशी आशा आहे.

दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले, “गेल्या वेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सलग सुनावणी घेऊ असं सांगितलं होतं. त्यामुळे यावेळी तरी सलग सुनावणी व्हावी. 26 नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चिन्हांचं वाटप होणार आहे, त्यामुळे आजच निर्णय झाला तर अधिक चांगलं होईल.”

देसाई पुढे म्हणाले, “पक्ष आणि चिन्हावरील प्रकरणात बराचसा युक्तिवाद झाला आहे. त्यामुळे निकालाला जास्त वेळ लागायला नको. आमदार अपात्रता प्रकरण याच्याशी जोडलेलं आहे, त्यामुळे दोन्ही मुद्दे परस्पर संबंधित आहेत.”

विधान परिषदेचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं, “अनेक वेळा निराशा झाली आहे, पण आम्ही आशावादी आहोत. तीन वर्ष वाट पाहिली आहे, अजून थोडं थांबू. निकाल आमच्या बाजूने येईल, याची खात्री आहे.”

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोन केला. यावर प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले, “ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आजारी असताना विचारपूस करणं. पण या सदिच्छा आणि कोर्टातील लढत हे दोन वेगळे विषय आहेत.”

अ‍ॅड. असिस सरोदे यांनी सांगितलं, “माझी सनद रद्द झाली असली तरी केसवर त्याचा परिणाम होणार नाही. मी वकिलांच्या टीमचा भाग आहे आणि सर्व काम जबाबदारीने करत आहे. निवडणूक आयोगाने खोडसाळपणा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या सहीने एबी फॉर्म देण्यात आले होते, त्यामुळे पक्ष कोणाचा हे स्पष्ट दिसतं. मात्र धनुष्यबाण चिन्ह आणि ‘शिवसेना’ नावाचा फायदा शिंदे गटाला झाला.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ