spot_img

Sunil Shetty : सुनील शेट्टीची कोर्टात धडक! नातीच्या फोटोंच्या गैरवापरावर अभिनेता संतापला

spot_img

बनावट फोटो वापरून व्यवसायिक प्रसिद्धी करणाऱ्या वेबसाइट्सविरोधात सुनील शेट्टीची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

बॉलिवूडचा दमदार अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी चित्रपटामुळे नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी. सुनील शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याने काही सोशल मीडिया पेजेस आणि वेबसाइट्सवर त्याचे आणि त्याच्या नाती इवाराचे फोटो परवानगीशिवाय वापरले जात असल्याचा आरोप केला आहे.

या फोटोंचा वापर काही व्यवसायिक कंपन्या स्वतःच्या जाहिरातींसाठी करत असल्याचे उघड झाल्यानंतर शेट्टी यांनी न्यायालयाकडे तातडीने कारवाईची मागणी केली. त्यांच्या अर्जात, अशा सर्व वेबसाइट्सना फोटो तात्काळ हटवण्याचे आदेश द्यावेत आणि भविष्यात अशा कृतीवर बंदी घालावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

शुक्रवारी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर (Arif Doctor) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी घेतली. सुनील शेट्टींचे वकील बिरेंद्र सराफ (Birendra Saraf) यांनी न्यायालयासमोर संबंधित वेबसाइट्सवर पोस्ट झालेल्या बनावट प्रतिमा दाखवत युक्तिवाद केला. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतला असून, निर्णय राखून ठेवला आहे.

सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल (K.L. Rahul) यांचा 2023 मध्ये शाही थाटात विवाह झाला होता. लग्नानंतर दोघांना इवारा नावाची मुलगी झाली आहे. आता तिच्याच फोटोंचा गैरवापर झाल्याने सुनील शेट्टीने कायदेशीर पाऊल उचलले आहे.

यापूर्वीही अनेक बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अनिल कपूर (Anil Kapoor), करण जोहर (Karan Johar), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), अभिषेक आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बच्चन यांनीही त्यांच्या प्रतिमा आणि व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. आता या यादीत सुनील शेट्टीचं नावही समाविष्ट झालं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ