spot_img

Sunetra Pawar : दादांच्या खुर्चीला नमन करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला कार्यभार!

spot_img

सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. राज्याच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्लीकारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. मंत्रालयातील केबिनमध्ये अजित पवार ज्या खुर्चीवर बसायचे, त्याच खुर्चीला नमन करून सुनेत्रा पवार यांनी कार्यभार स्वीकारलाय. हे चित्र पाहताना पार्थ पवार (Parth Pawar) भावुक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

अजित पवार यांचा दशक्रिया विधी होईपर्यंत बारामतीत थांबलेल्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) सोमवारी मुंबईला आल्या होत्या. उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना चैत्यभूमीवर जाऊन वंदन केले. त्यासोबतच सिद्धीविनायकाच्या चरणी त्या लीन झाल्या. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांनी मंत्रालयात पाऊल ठेवले. अजित पवार यांच्या स्मृतीला वंदन करून त्यांनी राज्यातील लोकांच्या सेवेसाठी प्रण केला आहे. यावेळी सगळेच भावुक झाले होते. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून या बैठकीला पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहे. त्याआधी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह त्यांनी प्रि-कॅबिनेटला हजेरी लावली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ