spot_img

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर; प्रधानमंत्री मोदी आणि शाहांची घेणार भेट

spot_img

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आज मुंबईत येऊन मंत्रालयात हजार राहणार आहेत. तिथे उपमुख्यमंत्री पदाचा त्या पदभार स्विकारणार आहेत. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील हजेरी लावणार आहेत. मुंबईतील कामं उरकल्यानंतर आजच सुनेत्रा पवार दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राहणार आहेत. तसेच त्या उद्या त्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

या भेटीत सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल चर्चा करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यानंतर लगेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? की दोन्ही गटाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून एनडीएला पाठिंबा देणार? याबाबत चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवार दिल्लीला गेल्याची माहिती आहे.

मागील काही दिवसांपासून बारामतीत पवार कुटुंबीयांच्या बैठकांचा सिलसिला सुरू होता. काल अचानक शरद पवारांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना व्हायरल इन्फेक्शन असून त्यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अशात सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जात असताना विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ