Summer Health Care : थंड वाटणाऱ्या आईस्क्रीममुळे वाढू शकते उष्णता ?

spot_img

उन्हाळ्याच्या कडक तापमानात गारवा मिळवण्यासाठी लोक एसी, कूलरसोबतच थंड पदार्थांकडे वळतात. त्यात आईस्क्रीम हा सर्वांचा आवडता पर्याय असतो. मात्र, आईस्क्रीम खाल्ल्याने खरोखर शरीर थंड होतं का, याबाबत अनेकांना शंका असते.

आईस्क्रीम चवीला आणि स्पर्शाला थंड असलं तरी त्यात साखर आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. म्हणूनच काही वेळा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पुन्हा तहान लागणे किंवा जडपणा जाणवतो. म्हणजेच, कडक उन्हात आईस्क्रीम खाल्लं तरी ते नेहमीच फायदेशीर ठरतं असं नाही.

याशिवाय, जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाल्ल्यास पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. अपचन, गॅस किंवा पोट बिघडण्याची शक्यता वाढते. काही लोकांमध्ये घसा खवखवणे, सर्दी किंवा खोकल्याचे लक्षणही दिसू शकतात, विशेषतः ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते.

आईस्क्रीम खाण्यासाठी ठराविक असा ऋतू नसला तरी तीव्र उन्हात त्याचे सेवन टाळणे अधिक योग्य मानले जाते. हलक्या हवामानात किंवा मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास सहसा त्रास होत नाही. आईस्क्रीम खाताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. शक्य असल्यास घरगुती आईस्क्रीम निवडावं, ज्यात कृत्रिम घटक कमी असतात. बाहेरचं आईस्क्रीम खाताना त्याची गुणवत्ता आणि स्वच्छता तपासावी. जर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा छातीत जडपणा जाणवला, तर ते दुर्लक्षित न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

एकंदरीत, उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणं चुकीचं नाही, पण त्याचं प्रमाण आणि वेळ याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ