spot_img

Students Protest : बुरखाबंदी हटविण्यासाठी मुंबईतील महाविद्यालयात आंदोलन !

spot_img

विवेक महाविद्यालयात बुरखाबंदी हटवण्यात यावी यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली होती, या आंदोलनाला एमआयएमने देखील पाठिंबा दिला होता.

मुंबईमधून (Mumbai) मोठी बातमी समोर आली आहे, गोरेगावमधील कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विवेक महाविद्यालयात याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे, एमआयएमच्या नेत्या जहांआरा शेख या देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. बुरखाबंदी हटवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच आता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. कॉलेज परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आज सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली होती, बुरखाबंदी हटवण्याची मागणी करण्यात येत होती, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, मात्र आता या सर्व विद्यार्थिनी आपल्या घरी गेल्या आहेत. कॉलेजामध्ये जी बुरखाबंदी लागू करण्यात आली आहे, ती मागे घ्या अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

या आंदोलनाला एमआयएमकडून (AIMIM) देखील सपोर्ट करण्यात आला होता. एमआयएमच्या नेत्या जहांआरा शेख या देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, दरम्यान एमआयएमनंतर आता मनसेचे कार्यकर्ते देखील या कॉलेजामध्ये पोहोचले आहेत, मात्र या आंदोलनानंतर आता कॉलेजच्या गेटवरच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच ज्यांचं आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलकांना देखील इथून आता हटवण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ