spot_img

Stranger Things 5 Finale Episode : ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’चा फिनाले ठरला डोकेदुखीचा! शेवटच्या एपिसोडवेळी नेटफ्लिक्स क्रॅश

spot_img

जगभरातील चाहत्यांची प्रचंड गर्दी, तांत्रिक बिघाडामुळे निराशा; सोशल मीडियावर संताप आणि मीम्सचा पाऊस

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय आणि सुपरहिट वेब सीरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. 2026 या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच या सीरिजचा बहुप्रतिक्षित आठवा आणि अंतिम एपिसोड ‘द राइटसाइड अप’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला. मात्र, ज्याची चाहत्यांना महिनोन्‌महिने प्रतीक्षा होती, तो फिनाले अनेकांसाठी निराशाजनक ठरला.

फिनाले एपिसोड रिलीज होताच जगभरातील लाखो प्रेक्षकांनी एकाच वेळी नेटफ्लिक्सवर लॉग इन केलं. याच प्रचंड ट्रॅफिकमुळे काही काळासाठी नेटफ्लिक्सचा सर्व्हर क्रॅश झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही तांत्रिक अडचण सुमारे एक मिनिट चालली. यावेळी युजर्सच्या स्क्रीनवर, “काहीतरी चुकलंय. आम्ही तुमची विनंती पूर्ण करू शकत नाही” असा संदेश दिसत होता.

जरी काही वेळात समस्या दूर करण्यात आली, तरी तोपर्यंत प्रेक्षकांचा संताप सोशल मीडियावर व्यक्त झाला होता. अनेक चाहत्यांनी स्क्रीनशॉट शेअर करत नेटफ्लिक्सवर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी या घटनेवरून मजेशीर मीम्सही व्हायरल केले. हा विषय काही काळासाठी सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये राहिला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नेटफ्लिक्स आणि सीरिजच्या निर्मात्यांना चाहत्यांची माफी मागावी लागली.

“स्ट्रेंजर थिंग्सच्या फिनालेवेळी नेटफ्लिक्स क्रॅश होणं आता अपेक्षितच आहे,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर, “उत्सुकता क्षणात निराशेत कशी बदलायची हे नेटफ्लिक्सकडून शिकायला हवं,” असं दुसऱ्याने म्हटलं. विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2022 मध्ये ‘स्ट्रेंजर थिंग्स 4’ च्या शेवटच्या भागातही अशीच अडचण आली होती.

दरम्यान, कथानकाबाबतही काही चाहते नाराज असल्याचं पाहायला मिळालं. ‘वॉल्युम 2’मध्ये वेक्ना कमकुवत मुलांचा वापर करून आपलं ध्येय साध्य करताना दाखवण्यात आला होता. मात्र, अंतिम एपिसोडमध्ये वेक्नाचा मृत्यू अतिशय सहज आणि साध्या पद्धतीने दाखवण्यात आल्यामुळे काही प्रेक्षक निराश झाले. गोळीबारात आणि बंदुकीने वेक्नाचा शेवट झाल्याचं दाखवणं अपेक्षेप्रमाणे भव्य नसल्याची प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहे. तरीही, या सगळ्या वादांनंतरही ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’ चा फिनाले जगभरात चर्चेचा विषय ठरला असून, सीरिजने आपली लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ