spot_img

ST New Bus Service : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सेवेत येणार ‘राजमाता जिजाऊ’ बस

spot_img

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या आणि आधुनिक बस दाखल होणार असून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे या नव्या बससेवेत अनेक बाबतीत वेगळेपण पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील महान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणून एसटी महामंडळाने नव्या बससेवेला राजमाता जिजाऊ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी एसटीने शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसेस सुरू करून इतिहास आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधला आहे. आता त्याच परंपरेत राजमाता जिजाऊ या नावाची भर पडली आहे.

राज्यभरातील वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये यासाठी एसटीने 3 बाय 2 आसन रचनेच्या 55 आसनी अत्याधुनिक बस खरेदी केल्या. या बसमध्ये प्रशस्त आसन व्यवस्था, अधिक आरामदायी रचना आणि आधुनिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. या नव्या राजमाता जिजाऊ बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बस आकर्षक दिसणार असून एसटीच्या ओळखीला नवी झळाळी मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ