spot_img

Squash World Cup : भारताने पहिल्यांदा जिंकले स्क्वॉश वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद

spot_img

अभय सिंग आणि अनाहत सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताच्या पहिल्या स्क्वॅश वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (Squash World Championship) जोशना चिनप्पा, अभय सिंग आणि अनाहत सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी 2023 च्या स्क्वॅश वर्ल्ड कपमध्ये भारताचे विजेतेपद थोडक्यासाठी हुकले होते. त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आजपर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि इजिप्त सारख्या संघांनी हे विजेतेपद जिंकले आहे.

चेन्नई (Chennai) येथे झालेल्या स्क्वॅश विश्वचषकात पाच उपखंडातील 12 संघांनी भाग घेतला होता.ऑस्ट्रेलिया, इजिप्त, हाँगकाँग, जपान, मलेशिया, इराण, पोलंड, दक्षिण आफ्रिका आणि स्वित्झर्लंड सारख्या बलाढ्य देशांचा समावेश होता. भारतीय संघाने वर्चस्व राखत या क्रीडाप्रकारात नवा अध्याय लिहिला आहे. आता या स्पर्धेतील निश्चितच फायदा होणार आहे. भारताला मिळालेला विजय निश्चितच आनंदाचं कारण आहे. कारण लॉस अँजेलिस 2028 मध्ये स्क्वॅश क्रीडा प्रकार आहे. त्यामुळे भारताला या विजयामुळे बळ मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ