spot_img

Soybean Market Update : सोयाबीनचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

spot_img

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन (Soybean) च्या दरांमध्ये सध्या संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. काही प्रमुख बाजारांत दर्जेदार मालाला चांगला भाव मिळत असताना, काही ठिकाणी कमी आवक आणि दर्जामुळे दरांवर दबाव दिसून येत आहे. २३ जानेवारी २०२६ रोजीच्या बाजार समित्यांच्या आकडेवारीनुसार सोयाबीनचा सर्वसाधारण दर ४,७०० ते ५,३६५ रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. राज्यात सर्वाधिक सोयाबीनची आवक अमरावती बाजार समितीत नोंदवली गेली. येथे तब्बल ५,७८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. लोकल प्रतीच्या सोयाबीनला किमान ५,१०० तर कमाल ५,३०० रुपये भाव मिळाला असून, सर्वसाधारण दर ५,२०० रुपये राहिला. मोठ्या प्रमाणातील आवक असूनही दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुर्तीजापूर बाजार समितीत पिवळ्या प्रतीच्या सोयाबीनला चांगली मागणी राहिली. येथे १,१०० क्विंटल आवक असून, दर ५,३३० ते ५,४०० रुपये दरम्यान राहिले. सर्वसाधारण दर ५,३६५ रुपये नोंदवण्यात आला, जो आजच्या बाजारातील उच्चांकी दरांपैकी एक ठरला. तसेच तुळजापूर बाजारात १६५ क्विंटल आवक झाली असून, येथे सोयाबीनला थेट ५,३५० रुपये असा एकसमान दर मिळाला. दर्जेदार आणि स्वच्छ मालामुळे व्यापाऱ्यांनी चांगला भाव दिल्याचे चित्र आहे.

नागपूर बाजार समितीत लोकल सोयाबीनची ६२९ क्विंटल आवक झाली. येथे किमान ४,४०० तर कमाल ५,२५१ रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ५,०३८ रुपये राहिला. दर्जानुसार दरांमध्ये मोठी तफावत दिसून आली. चंद्रपूर बाजारात मात्र आवक अत्यल्प म्हणजेच ३६ क्विंटल इतकीच राहिली. येथे किमान ४,२०० तर कमाल ४,९४० रुपये भाव मिळाला. सर्वसाधारण दर ४,७०० रुपये असल्याने या भागात दर काहीसे दबावाखाली असल्याचे स्पष्ट होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ