spot_img

South India Tourism : दक्षिण भारतात फिरायला जायचं आहे पण कसं ? इतक्या कामी खर्चात आत्ता करा दक्षिण सफरी !

spot_img

दक्षिण भारतात (South India) फिरायला जायचं आहे ? पण कोणत्या ठिकाणांना भेट द्यायची हे काळात नाही त्याबरोबरच किती खर्च येईल याची काळजी असते , योग्य ट्रिप प्लॅन कशी करावी समजत नाहीये तर जाणून घ्या….

आपल्या भारतात फिरण्यासाठी बरीच ठिकाणं आहेत. त्यात दक्षिण भारत तर अद्भुत आहे. येथे तुम्हाला हिरवळीपासून ते समुद्रकिनारे आणि धार्मिक स्थळांपर्यंत, हिरव्यागार निसर्गाचं सौंदर्य सगळंकाही पाहायला मिळेल. जर तुम्ही दक्षिण भारत फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आजच्या लेखात तुम्ही कोणत्या ठिकाण एक्सप्लोर करता येऊ शकत आणि किती खर्च येईल ते जाणून घेऊयात…

केरळ (Keral) हे दक्षिण भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे. येथील नैसर्गिक नयनरम्यसौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. केरळ हे असे राज्य आहे जिथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात हरवून गेल्यासारख वाटेल. अलेप्पीचे बॅकवॉटर, आयुर्वेदिक मसाले आणि हाऊसबोट्स हे पाहून आनंद द्विगुणित होईलच पण संस्मरणीय बनवू शकतात. मुन्नार, एक हिल स्टेशन, अलेप्पी, थेक्कडी आणि कोची अशी अनेक ठिकाणे देखील आहेत. केरळमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही विमान आणि ट्रेनने जाऊ शकता. केरळ फिरण्याचा खर्च तुमच्या राहण्याचा खर्च, जेवण आणि पर्यटन हे पकडून अंदाजे 10,000 ते 20,000 रुपयांपर्यंत होऊ शकतो.

केरळ बरोबरच तामिळनाडू देखील पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तामिळनाडूतीळ हे त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते त्याबरोबरच हे राज्य त्याच्या संस्कृती, शास्त्रीय नृत्य भरतनाट्यमसाठी प्रसिद्ध आहे. मदुराई (मीनाक्षी मंदिर), रामेश्वरम रामेश्वरम, तंजावर आणि कन्याकुमारी ही ठिकाणे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहेत. जर तुम्ही धार्मिक स्थळांना भेट द्यायला आवडत आणि तुम्ही पर्यटनासाठी दक्षिण भारतात येत असाल तर तामिळनाडूपेक्षा चांगले काहीही नाही. हे मंदिर अद्भुत आहे. समुद्रकिनाऱ्यांना भेट दिल्याने सूर्यास्ताचे एक नयनरम्य दृश्य दिसते. तुम्ही येथे ट्रेन, विमान किंवा स्वत:च्या गाडीने प्रवास करू शकता. बजेटनुसार, तामिळनाडू केरळपेक्षा थोडे स्वस्त आहे. तुम्ही 8,000 ते 15,000 रुपयांना येथील ठिकाणांना भेट देऊ शकता.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ