Sonakshi Sinha : सोनाक्षीच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर ‘आजी’ होण्याबाबत पहिल्यांदाच सोनाक्षीच्या आईने सोडले मौन

spot_img

लग्नानंतर सतत सुरू असलेल्या अफवांवर शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नीने दिले स्पष्टीकरण; मुलीच्या सुखासाठी खंबीरपणे उभ्या असलेल्या आईची भावनिक साद.

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचे लग्न झाल्यापासून त्या दोघांची सोशल मीडियावर सतत चर्चा होत आहे. आंतरधर्मीय विवाह आणि भावांचा विरोध यामुळे हे लग्न आधीच वादात राहिले होते, परंतु आता सर्वांचे लक्ष सोनाक्षीच्या प्रेग्नंसीच्या अफवांकडे लागले आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. आता या प्रकरणावर तिची आई पूनम सिन्हा यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. पूनम सिन्हा म्हणाल्या की, “लोकांनी आम्हाला माहिती नाही किती वेळा आजी-आजोबा बनवले आहे, पण चला… तो आनंदही आम्हाला लवकरच मिळेल.” त्यांच्या या विधानामुळे सोनाक्षीच्या चाहत्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण असून, आईने दिलेल्या या सकारात्मक संकेतामुळे अफवांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे.

पूनम सिन्हा यांनी यावेळी आपल्या मुलीचे कौतुक करताना म्हटले की, आयुष्यात मुलीचे असणे किती आवश्यक आहे आणि सोनाक्षीचे त्यांच्या आयुष्यातील आगमन हा सर्वात आनंदाचा क्षण होता. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरने मुंबईच्या एका उच्चभ्रू वस्तीत आलिशान घर घेतले असून ते तिथे आपला संसार थाटत आहेत. सलमान खानच्या घरी सुरू झालेली ही लव्हस्टोरी आता एका नव्या वळणावर आली आहे. एकीकडे सोनाक्षीने आपले वजन वाढल्याचे सांगून प्रेग्नंसीच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या, तर दुसरीकडे तिच्या आईने ‘लवकरच तो आनंद मिळेल’ असे म्हटल्याने आता सिन्हा कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन कधी होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ