spot_img

Soham Bandekar : डिनर डेट नाही, तर चक्क ठाण्यातील पाणीपुरीने सुरू झाली सोहम–पूजाची प्रेमकहाणी; बाबांचा खास मेसेज ठरला टर्निंग पॉईंट

spot_img

मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नसोहळ्यांची धूम सुरू असतानाच अभिनेता आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यानेही आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे. सोहम आणि पूजा बरारी यांच्या लग्नाचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे हा सोहळा चर्चेचा विषय ठरला. मात्र या ग्लॅमरस लग्नामागची लव्हस्टोरी मात्र तितकीच गोड आणि हटके आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोहमने आपल्या प्रेमकहाणीची मजेशीर सुरुवात उघड केली. विशेष म्हणजे ही गोष्ट कुठल्याही फॅन्सी डेटपासून नाही, तर साध्या पाणीपुरीपासून सुरू झाली होती. सोहमने सांगितले की पूजाबद्दल घरच्यांकडून आधीच सकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या. आजी, मावशी यांच्यासह खुद्द आदेश बांदेकर यांनीही सोहमला पुढाकार घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.

सोशल मीडियावरून दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. खाद्यप्रेमामुळे गप्पांना आणखी रंग चढला. पूजाला पाणीपुरी फार आवडते हे समजताच सोहमने तिला थेट ठाण्यातील खास पाणीपुरी ट्रिपसाठी आमंत्रण दिलं. तिथे भेटल्यानंतर दोघांचे विचार, स्वभाव आणि आवडी जुळत असल्याचं लक्षात आलं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.

यानंतर कुटुंबियांची भेट, गिफ्ट एक्सचेंज आणि एकत्र जेवण… या सगळ्या टप्प्यांतून जात अखेर लग्नाची तारीख ठरली. अशा साध्या पण खास क्षणांतून उभी राहिलेली सोहम–पूजाची प्रेमकहाणी सध्या चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ