spot_img

Soaked sprouts Benefits : थंडीमध्ये चणा खाणं किती फायदेशीर? मोड आलेला, उकडलेला की भाजलेला – जाणून घ्या नेमका फरक

spot_img

प्रथिनांचा उत्तम स्रोत असलेला चणा कोणत्या पद्धतीने खाल्ल्यास मिळतात जास्त आरोग्य फायदे?

हरभरा म्हणजेच चणा हा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी कडधान्य मानला जातो. विशेषतः हिवाळ्यात चणा आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. चण्यात लोह, प्रथिने, कॅल्शियम, फायबरसह अनेक आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे मांसाहार न करणाऱ्यांसाठी चणा हा प्रथिनांचा उत्तम पर्याय ठरतो. नॉनव्हेजइतकेच प्रथिने मिळू शकतात, असेही म्हटले जाते.

चणा खाण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत. काही जण मोड आलेला चणा खातात, काही उकडलेला तर काही भाजलेला. पण यापैकी कोणती पद्धत आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो.

मोड आलेला चणा – सर्वाधिक फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते, मोड आलेला चणा पचनासाठी उत्तम ठरतो. यामुळे गॅस व अपचनाच्या तक्रारी कमी होतात. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. यामध्ये पोटॅशियमही मुबलक असते, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. शिवाय, चणा गरम न केल्यामुळे त्यातील पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात टिकून राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

उकडलेला चणा – पचायला सोपा

उकडलेला चणा देखील आरोग्यासाठी लाभदायक आहे. तो सहज पचतो आणि शरीराला चांगली ऊर्जा देतो. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो, कारण चणा भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. मात्र उष्णतेमुळे त्यातील काही पोषक घटक कमी होऊ शकतात. तरीही, लोहाचे प्रमाण असल्यामुळे अशक्तपणा दूर करण्यास उकडलेला चणा उपयुक्त आहे.

भाजलेला चणा – हेल्दी स्नॅक

भाजलेला चणा हा कमी फॅट्स असलेला, उच्च प्रथिनयुक्त नाश्ता आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी तो फायदेशीर मानला जातो. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही भाजलेला चणा चांगला पर्याय आहे, कारण तो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. मात्र काही लोकांना तो खाल्ल्यानंतर पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात.

चणा कोणत्याही स्वरूपात आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. मात्र जास्त पोषक घटक हवे असतील तर मोड आलेला चणा सर्वोत्तम ठरतो, पचायला सोपा पर्याय हवा असेल तर उकडलेला, तर हलका आणि हेल्दी नाश्ता म्हणून भाजलेला चणा निवडता येतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ