spot_img

Smriti Mandhana ill before WPL final :  103 डिग्री तापातही स्मृतीचा रणसंग्राम! आरसीबीने जिंकले दुसरे WPL विजेतेपद

spot_img

फायनलच्या आधी अंथरुणातून उठू न शकणारी कॅप्टन, फायनलमध्ये ठरली आरसीबीची विजयशिल्पकार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) विमेन्स प्रीमियर लीगमधील आपले दुसरे विजेतेपद पटकावत इतिहासात मानाचा ठसा उमटवला आहे. या विजयामागे आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाची असामान्य जिद्द आणि नेतृत्व केंद्रस्थानी ठरले. फायनल सामन्यात तिने केलेली फलंदाजी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नव्हती, तर ती मानसिक आणि शारीरिक लढ्याची जिवंत उदाहरण ठरली.

5 फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात दिल्लीने दिलेले मोठे लक्ष्य आरसीबीने आत्मविश्वासाने गाठले. स्मृती मंधानाने अवघ्या 41 चेंडूंमध्ये 87 धावांची तडाखेबंद खेळी करत दिल्लीच्या गोलंदाजांची एकही चाल चालू दिली नाही. तिच्या या आक्रमक इनिंगमुळे आरसीबीचा विजय सोपा झाला आणि संघाने दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली.

मात्र, या ऐतिहासिक खेळीमागची खरी कथा अधिक थरारक आहे. फायनलच्या एक दिवस आधी म्हणजे 4 फेब्रुवारीला स्मृतीला तब्बल 103 डिग्री ताप होता. प्रकृती इतकी खालावली होती की ती नीट उभी राहूही शकत नव्हती. तरीही संघासाठी खेळण्याचा निर्धार करत तिने मैदानात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला.

तापामुळे फिल्डिंग करताना तिला वाकणेही कठीण जात होते, शरीरात प्रचंड अशक्तपणा होता. याच कारणामुळे बक्षीस वितरण सोहळ्यापूर्वी ती बराच वेळ डगआउटमध्येच विश्रांती घेत होती. पण मैदानावर उतरल्यावर तिच्या खेळात कुठेही आजाराचा मागमूस दिसला नाही.

स्मृतीने जॉर्जिया वॉलसोबत 165 धावांची निर्णायक भागीदारी करत आरसीबीचा विजय जवळपास निश्चित केला. स्वतः धावा काढतानाच तिने संघातील इतर खेळाडूंनाही आत्मविश्वास दिला. शारीरिक त्रास असतानाही दाखवलेली तिची मानसिक कणखरता साऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

या अविस्मरणीय खेळीसाठी स्मृती मंधानाला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिची ही कामगिरी आता WPL च्या इतिहासातील आयकॉनिक क्षणांपैकी एक मानली जात आहे.

आरसीबी चाहत्यांसाठी हे विजेतेपद केवळ ट्रॉफीपुरते मर्यादित नाही, तर कॅप्टनने आरोग्याची पर्वा न करता दिलेल्या बलिदानाची आठवण आहे. स्मृती मंधानाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की खरी जिद्द असेल, तर कोणताही अडथळा विजयाच्या आड येऊ शकत नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ