spot_img

Smriti Mandhana Father Health : स्मृती मंधानाच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिले महत्वाचे अपडेट !

spot_img

डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे.

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली होती. यादरम्यान अत्यंत दु:खद बातमी समोर आली. मंधाना फार्महाऊसवर लग्नाची तयारी सुरू असताना स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्मृती हिच्या वडिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वडिलांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे स्मृती हिचं लग्न देखील पुढे ढकलण्यात आलं. आता स्मृतीच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी स्मृती हिच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसापासून सांगलीतील सर्वहित डॉक्टर महेश शहा यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना रात्री उशिरा डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डिस्चार्ज मिळाल्याने स्मृतीच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ