लवकरच लग्नबंधनात अडकणार स्मृती मंधाना
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर (DY Patil Stadium) हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनशिपखाली भारतीय महिला टीमने पहिल्यांदा ICC वुमेन्स वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे.दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनले.भारताच्या या विजयात तीन खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची ठरली. शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा आणि अमनजोत कौरची फील्डिंग महत्वाची ठरली. बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देणाऱ्या शेफाली वर्मा हीला वूमन ऑफ द मॅच पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं.भारताला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाण्यात स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचे मोठे योगदान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने विजय मिळवताच त्याने स्मृती मंधानासोबतचे काही फोटो शेअर केले होते. सोबतच त्याने भारताची विजयी ट्रॉफी हातात घेऊन भारतीय संघाचे अभिनंदन केले होते. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर आता स्मृती मंधानासोबतच तिच्या बॉयफ्रेंडचीही सगळीकडे चर्चा चालू आहेत.
स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडचे नाव पलाश मुच्छल असे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.दोघांच्या वयात दोन वर्षांचं अंतर आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2019 सालापासून ते नात्यात आहेत.लवकरच स्मृती मंधाना आणि संगीतकार-पटकथाकार पलाश मुच्छल (Palash Mucchal) हे २० नोव्हेंबरला लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबाबत टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे लग्न महाराष्ट्रातील सांगली येथे पार पडणार आहे. सांगली हे स्मृती मंधानाचे मूळ गाव असून, विवाहसोहळ्याचे काही कार्यक्रम २० नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
पलाश मुच्छल भारतीय संगीतकार आणि फिल्म प्रोड्युसर आहे. तर, पलाशची मोठी बहीण पलक मुच्छल (Palak Muchhal) बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे.सलमान खानपासून ते हृतिक रोशनपर्यंतच्या चित्रपटांमधील अनेक प्रसिद्ध गाणी पलकनं गायली आहेत.पार्टी तो बनती है, तू ही है आशिकी या गाण्यांसाठी पलाशला ओळखले जाते. तू जो कहे, निशा आणि फॅन्स नही फ्रेण्ड्स यासारखे म्युझिक व्हिडीओंचीही त्याने निर्मिती केलेली आहे. अभिनेता म्हणूनही खेलें हम जी जान या चित्रपटात काम केलेले आहे. अर्ध यासारख्या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शनही केलेले आहे.पलाशच्या नेटवर्थबाबत बोलायचं झालं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची एकूण संपत्ती 20 ते 41 कोटी रुपयांची असल्याचं बोललं जात आहे. पलाशची एकूण संपत्ती 30 ते 40 कोटी रुपये आहे.




