spot_img

Singer Udit Narayan in Spotlight : उदित नारायण वादाच्या भोवऱ्यात; एक्स पत्नीचे गंभीर आरोप, वाढदिवसाच्या व्हिडिओवरून ट्रोलिंग

spot_img

आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया नाही; अभिजीत भट्टाचार्यच्या पार्टीतील व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांची माजी पत्नी रंजना नारायण झा यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या संमतीशिवाय गर्भाशय काढून टाकल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणामुळे मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. रंजनांनी उदित यांच्यासह आणखी तिघांविरुद्धही आरोप केल्याचे समोर आले आहे. मात्र या सर्व आरोपांवर उदित नारायण यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे प्रकरण चर्चेत असतानाच उदित नारायण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेले दिसतात. हा व्हिडिओ अभिजीत यांचा मुलगा जयने चित्रीत केल्याची माहिती आहे. व्हिडिओमध्ये संगीतकार जतिन पंडित यांचीदेखील उपस्थिती दिसते. उदित नारायण ‘पहला नशा’ हे लोकप्रिय गाणे गाताना आणि पार्टीचा आनंद घेताना दिसत आहेत.

मात्र या व्हिडिओतील एका बाबीने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले. पार्टीच्या ठिकाणी मागील बाजूस भगवान गणेशाचा फोटो दिसत असून, त्याच्यासमोर मद्यपान केल्याचा आरोप करत काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. देवाच्या प्रतिमेसमोर अशी पार्टी करणे अयोग्य असल्याचे म्हणत अनेकांनी उदित नारायण यांना ट्रोल केले. काहींनी वाढदिवस साजरा करण्यात गैर नाही, मात्र धार्मिक प्रतिमेचा आदर राखायला हवा होता, अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, रंजना नारायण झा (Ranjana Jha) यांनी सांगितले की त्यांचे आणि उदित नारायण यांचे लग्न ७ डिसेंबर १९८४ रोजी झाले होते. १९८५ मध्ये करिअरसाठी उदित मुंबईत आले आणि त्यानंतर त्यांनी दीपा नारायण यांच्याशी दुसरे लग्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व घडामोडींमुळे उदित नारायण पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले असून, त्यांच्या अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ