spot_img

Shoaib Akhtar : पाकिस्तानचा पराभव होताच शोएब अख्तरची भूमिका चटकन बदलली

spot_img

इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा उडताच अख्तरची कोलांटीउडी; भारतीय फॅन्समध्ये संतापाची लाट

नेहमी भारतीय वाहिनीवर बसून टीम इंडियाचे गोडवे गाणाऱ्या शोएब अख्तरचे भारताबद्दलचे विषारी विचार आता जगासमोर आले आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बोलताना अख्तरने आपली खरी मानसिकता उघड केली. “इंग्लंडने वाईट खेळावे आणि भारताची टीम या स्पर्धेतून बाहेर व्हावी, भारताच्या पराभवाने मला सर्वाधिक आनंद होईल,” असे धक्कादायक वक्तव्य त्याने केले. भारतीय माध्यमांकडून विश्लेषणाचे कोट्यवधी रुपये घेणाऱ्या अख्तरच्या या विधानामुळे क्रिकेट वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने झंझावाती शतक झळकावत पाकिस्तानचा दारूण पराभव केला आणि पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा जवळपास संपुष्टात आणल्या. स्वतःचा देश पराभूत होताच शोएब अख्तरने लगेच आपली भूमिका बदलली आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्यावर टीकेची झोड उठवली. भारताच्या पराभवाचे स्वप्न पाहणाऱ्या अख्तरला आता स्वतःच्याच संघाच्या खराब कामगिरीचे विश्लेषण करण्याची वेळ आली आहे. खेळात मैत्रीचा आव आणणाऱ्या या माजी वेगवान गोलंदाजाचा खरा ‘भारतद्वेष’ या निमित्ताने उघड झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ