spot_img

Shivdeep Lande Bihar Election 2025 : महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडेंना बिहार निवडणुकीत किती मतं मिळाली?

spot_img

शिवदीप लांडे हे बिहारच्या जमालपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आयज जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे. एनडीए आघाडीचे उमेदवार 207 जागांवर आघाडीवर आहेत. तर महागठबंधनचे उमेदवार अवघ्या 29 जागांवर आघाडीवर आहे. तर सहा जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजप आणि संयुक्त जनता दल बिहारमध्ये (Bihar Election Result 2025) सहजपणे सत्ता स्थापन करेल, असे संकेत मिळत आहेत. बिहारच्या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांचे भवितव्य पणाला लागले होते. यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या आणि बिहारचा सिंघम अशी ओळख असलेल्या शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. शिवदीप लांडे हे बिहारच्या जमालपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर जदयूच्या नचिकेता मंडल यांचे आव्हान होते.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, शिवदीप लांडे यांना 8536 मतं मिळाली आहेत. जमालपूर मतदारसंघात सध्या जदयूचे नचिकेता मंडल आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 50335 मतं मिळाली असून त्यांच्याकडे तब्बल 19 हजार मतांची आघाडी आहे. जमालपूर मतदारसंघात मतमोजणीच्या 28 पैकी 14 फेऱ्या पार पडल्या आहेत. आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये नचिकेता मंडल यांनी आघाडी टिकवून ठेवली आहे. तर शिवदीप लांडे यांना 8536 मतं मिळाली असली तरी ते तिसऱ्या स्थानावर आहेत. बिहार पोलीस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. शिवदीप लांडे यांनी निवडणुकीपूर्वी हिंद सेना पक्षाची स्थापना केली होती. मात्र, ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढले. शिवदीप लांडे यांनी बिहार पोलिसांच्या सेवेत असताना उल्लेखनीय काम केले होते. ते 2009 मध्ये मुंगेरमध्ये एएसपी म्हणून रुजू झाले होते आणि 2011 पर्यंत तिथेच काम केले. तीन वर्षांत मुंगेर मधील गुन्हेगारी संपवण्यावर भर दिला. यामुळे मुंगेरमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. या भागात त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. मात्र, ही लोकप्रियता त्यांना विजयाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाऊ शकली नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ