शिर्डीत (Shirdi) श्री साईबाबांच्या नगरीतही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली आहे. साई संस्थानने आज ३१ डिसेंबरची रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भाविकांना सुवर्ण खिडकीतून मुखदर्शन घेण्याचा सुखद अनुभव मिळत आहे. भाविकांचा वाढता ओघ पाहता १ जानेवारीची काकड आरती आणि ३१ डिसेंबरची शेजारती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अखंड दर्शन सुरू राहणार आहे.
नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातही पर्यटकांचा ओघ वाढल्याने ४ जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांना दर्शनासाठी ३ ते ४ तास प्रतीक्षा करावी लागत आहे. तर कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह जोतिबा डोंगर आणि पन्हाळगडावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. येथील सर्व हॉटेल्स आणि धर्मशाळा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. तसेच बुलढाण्यात विदर्भातील पळशी सुपो येथील संत सुपो महाराज यांच्या पौष यात्रेलाही सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने येथेही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. दरम्यान प्रशासन आणि सुरक्षा सज्ज गर्दीचे नियोजन करण्यासाठी पंढरपूर, शिर्डी आणि कोल्हापूरमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्या




