spot_img

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अडकले ६० कोटी फसवणुकी प्रकरणात.तब्बल ४.३० तास चालली चौकशी

spot_img

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty)आणि तीचा पती राज कुंद्रा (raj kundra) नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांस्तव चर्चेत असतात.यावेळी देखील 60 कोटीच्या प्रकरणात ते अडकले आहेत. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची चौकशी केली.शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. याआधी राज कुंद्रा यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तब्बल 4.30 तास दोघांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीनं तिच्या जाहिरात कंपनीच्या बँक खात्यातील कथित व्यवहारांची माहिती पोलिसांना दिली. त्याबरोबरोबरच शिल्पानं पोलिसांना अनेक कागदपत्रं दिली, ज्यांची पडताळणी सध्या सुरू आहे.

मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी दिलेल्या जबाबत असं म्हंटल कि , फसवणुकीची तक्रार करणाऱ्या दीपक कोठारी यांनी एका एनबीएफसीकडून 60 कोटींचं कर्ज घेतलेलं. हे कर्ज नंतर कोठारी यांच्या कंपनीत इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यात आलं. या रकमेतील 20 कोटी रुपये सेलिब्रिटी प्रमोशन, ब्रॉडकास्ट आणि इतर कारणांसाठी वापरले गेले. बिपाशा बसू आणि नेहा धुपिया यांना या कामासाठी पैसे देण्यात आलेत. राज यांनी पोलिसांना प्रमोशनचे फोटो देखील दिले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपनीची सध्या चौकशी सुरु आहे, त्या कंपनीची शिल्पा मोठी शेअर होल्डर आहे.त्यामुळे शिल्पा शेट्टीची देखील चौकशी केली गेली . पुरावे समोर आल्यानंतर एक मोठी गोष्ट देखील समोर येत आहे आणि ती म्हणजे, शेअर होल्डर असून देखील शिल्पाने सेलिब्रिटी फी घेतली आहे. ज्याला खर्चात दाखवण्यात आलं आहे. जे निधीचा गैरवापर दर्शवते.

ऑगस्ट 2025 मध्ये, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध 60.4 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये आता बंद पडलेल्या बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित ६० कोटी फसवणुकीच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध लुकोट नोटीस जारी करण्यात आली होती.  यूवाय इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक दीपक कोठारी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच, त्यांनी शिल्पा आणि राज कुंद्रावर आरोप केलाय की, राज आणि शिल्पानं 2015 ते 2023 दरम्यान त्यांना व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं.
हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ