spot_img

Sharad Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार म्हणाले या निर्णयाबाबत…

spot_img

बारामतीजवळ भीषण विमान दुर्घटना; राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का

28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे निघालेले एक खासगी विमान बारामती विमानतळाच्या परिसरात सकाळी 8.45 च्या सुमारास भीषण अपघाताला सामोरे गेले. या दुर्घटनेत विमानातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, कोणालाही वाचवता आले नाही.

या प्रवासामागे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजित चार प्रचारसभा होत्या. बारामतीत कार्यकर्ते विमानतळाबाहेर स्वागतासाठी जमले असताना, अचानक आलेल्या दुर्घटनेच्या बातमीने वातावरणात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली, मात्र काही वेळातच निधनाची बातमी पसरली आणि गोंधळ वाढला.

दरम्यान, या विमान अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओंमध्ये विमान हवेत असताना एका बाजूला झुकताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला.

या घटनेनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. नेतृत्वाच्या पोकळीमुळे पुढील वाटचालीबाबत चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड होणार, यावर तर्कवितर्क सुरू असतानाच, पत्नी सुनेत्रा पवार या सायंकाळी 5 वाजता शपथ घेणार असल्याची माहिती पुढे आली.

यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना, या निर्णयाबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे सांगितले. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे आणि एकत्र येण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मुंबईत दाखल होताच बारामती आणि मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी संदीप क्षीरसागर, रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यासह काही प्रमुख नेते दाखल झाले असून, सुप्रिया सुळेही (Supriya Sule) उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली. या भेटींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ