spot_img

Shah Rukh Khan Son : शाहरुखचा धाकटा लेक शिकतो सर्वात महागड्या शाळेत,फीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

spot_img

मुंबईतील सर्वात महागडया शाळेत शिकतो अबराम.

अभिनेता शाहरूख खानचा मुलगा अबरामबद्दल चाहत्यांना देखील जाणून घेण्याची उत्सुकता असते. जसं की अबराम किती वर्षांचा आहे? तसेच कोणत्या शाळेत तो शिकत आहे? अबराम खानच्या शाळेच्या कार्यक्रमातील कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यावेळी शाहरूखही त्याच्या फॅमिलीसोबत कार्यक्रमांना उपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. पण अबराम आता कोणत्या शाळेत शिकतो याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. तर अबराम ज्या शाळेत जातो ती मुंबईतील सर्वात महागडी शाळा आहे. अबराम खानची मुंबईतील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे. या शाळेत मुलांना शिक्षण देणे हे अनेकांसाठी अशक्य आहे. याचं कारण म्हणजे या शाळेची असणारी फी. अबराम खान हा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2003 मध्ये मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी केली होती.

अबराम 5 व्या इयत्तेत शिकतो आहे. शाहरुख खान दर महिन्याला 1 लाख 70 हजार रुपये फी भरतो. अबराम धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही बॉलिवूड स्टार्सच्या आवडत्या शाळांपैकी एक मानली जाते. बॉलिवूडमधील तसेच, प्रसिद्ध बिझनेसमनची मुले येथे शिक्षण घेतात. या शाळेत एलकेजी ते 7 वी पर्यंतचे मासिक फीस 170,000 आहे आणि 8 वी ते 10 वी पर्यंतचे फी 590,000 आहे. 11 वी आणि 12 वी पर्यंतची फी ही 965,000 आहे. ही शाळा मुलांना अनेक सुविधा देते. या शाळेत खेळाचे मैदान, इंटरनेट सुविधा, वातानुकूलित वर्गखोल्या, छतावरील बाग आणि टेनिस कोर्ट आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल हे सारा अली खान, खुशी कपूर, इब्राहिम अली खान, सुहाना खान, आर्यन खान, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, अनन्या पांडे, न्यासा देवगन हे स्टारकिड्सने देखील शिक्षण घेतलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ