बॉलीवूडचा किंग खान (King Khan) म्हणजेच शाहरुख खान (shah Rukh Khan) याचा 2 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. यंदा त्याने ६० पार केली असून चाहत्यांनी मन्नत बाहेर बरीच गर्दी केली होती. शुभेच्छांचा वर्षाव करत त्याच्या फॅन्सनी जल्लोष साजरा केला. पण वाढदिवसानिमित्त शाहरुखने त्याच्या फॅन्सला हे स्पेशअल गिफ्ट दिले आहे. त्याचा आगामी चित्रपटव “किंग” (King) याचा काल ट्रेलर लाँच करण्यात आला. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित “किंग” चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांमध्ये वेगळाच उत्सुकाच वातावरण निर्माण झाल आहे. या टीझर व्हिडिओमध्ये चित्रपटातील काही प्रसंग दाखवण्यात आले आहेत. तसेच शाहरूखचा फर्स्ट लूकही यात दाखवण्यात आला आहे. या चित्रपट त्याचा लुक त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा पाहायला मिळतो. त्या बरोबरच तगडी अॅक्शन आणि मास मसाला भरलेला हा टीझर लोकांना वेड लावतोय.
रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांच्या प्रोडकशन हाऊस मध्ये निर्मित झालेला हा चित्रपट, 2026 मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात शाहरुख खानची एक वेगळंच झलक आणि भूमिका दाखवण्यात आली आहे. पुन्हा एकदा, किंग ऑफ रोमान्स पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसणार असून जसे निर्मात्यांनी “किंग” च्या शीर्षकाच्या रिलीजमध्ये याची पुष्टी केली आहे. हा चित्रपट एक स्टाइलिश आणि अॅक्शन एंटरटेनर असणार आहे.
“किंग” चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरूखची भूमिका शक्तिशाली आणि उत्साही पद्धतीने मांडण्यात आली आहे असून हे एक असे पात्र आहे ज्याच्या नावामुळे दहशत निर्माण होते. दरम्यान यात दाखवण्यात आलेला एक एक डायलॉग शाहरूखच्या भूमिकेची जास्त ओळख करून देतो. तो डायलॉग म्हणजे “सौ देशों में बदनाम, दुनिया ने दिया सिर्फ एक ही नाम किंग” हा डायलॉग शाहरूखच्या त्या पात्राला अगदीच साजेसा दिला आहे ज्यामुळे तो टीझरचा लुक आणखी वाढवतो.
सिल्व्हर हेअर लूक, कानातले आणि स्टायलिश अंदाज या चित्रपटात दिसून येतो. शाहरूखचा असा लूक यापूर्वी कधीही पाहिला गेला नसेल असा आहे.“किंग” हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे असून त्याची नक्की तारीख अद्याप तरी समोर आलेली नाही. परंतु चाहत्यांमध्ये चित्रपटाला घेऊन उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय.




