spot_img

Sayaji Shinde : कुंभमेळ्याच्या तयारीत वृक्षतोड? का भडकले सयाजी शिंदे

spot_img

“एक झाड तोडलं तर आम्ही शंभर लोक मरायला तयार!” नाशिकमधील तपोवन संरक्षणासाठी उभे राहिले सयाजी शिंदे

नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विकासकामांना वेग आला आहे. मात्र या कामांसाठी तपोवन परिसरातील झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे हे केवळ प्रभावी कलाकारच नसून, ‘सह्याद्री देवराई’ या संस्थेमार्फत वृक्षसंवर्धनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सुरु असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

शिंदे म्हणाले, “तपोवनातील झाडतोड ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला नाशिकमधून फोन येत आहेत. एक झाड तोडलं, तर शंभर लोक जीव द्यायला तयार आहेत. सरकारने झाड तोडून दाखवावं!” असा थेट इशाराच त्यांनी दिला.

त्यांनी पुढे गिरीश महाजन यांच्या विधानावरही टीका केली. “एक झाड तोडलं तर दहा लावू, असं म्हणणाऱ्यांनी आतापर्यंत कोणत्या हायवेच्या कडेला घनदाट झाडं उभी केलीत? लोकांची थट्टा करायची की काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिंदेंच्या या परखड भूमिकेमुळे तपोवनातील जंगल वाचवण्यासाठीचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभ्या राहिलेल्या नागरिकांबरोबर सयाजी शिंदेंनी ठाम पाठिंबा दर्शवल्याने आता हे प्रकरण अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ