spot_img

Saurabh Rajput Murder Case : पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानने दिला मुलीला जन्म; DNA टेस्ट करण्याची सासरच्यांची मागणी !

spot_img

 मुस्कानने सोमवारी संध्याकाळी मेरठमधील मेडिकल कॉलेजमध्ये एका बाळाला जन्म दिला आहे.

सौरभ राजपूत हत्या प्रकरणातील आरोपी आणि सौरभ राजपूतची पत्नी मुस्कानने सोमवारी संध्याकाळी मेरठमधील मेडिकल कॉलेजमध्ये एका बाळाला जन्म दिला आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली. आई आणि मूल दोघेही निरोगी असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.मुस्कानला तिचा पती सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी (Saurabh Rajput Murder Case) तिचा मित्र साहिलसह अटक करण्यात आली होती. अटकेच्या वेळी ती गर्भवती होती. ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन परिसरातील इंदिरा नगर येथील रहिवासी मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लासह 3 मार्च रोजी तिचा पती सौरभ राजपूतची हत्या करण्याचा कट रचला. दोघांनी मृतदेहाचे चार तुकडे केले, ड्रममध्ये ठेवले आणि त्यात सिमेंट भरले. घटनेनंतर दोघेही हिमाचल प्रदेशात पळून गेले. नंतर, मुस्कानने तिच्या कुटुंबाला गुन्ह्याची माहिती दिली, ज्यांनी नंतर पोलिस तक्रार दाखल केली.

दुसरीकडे सौरभचा मोठा भाऊ राहुल राजपूत यांना बाळाची डीएनए चाचणी (DNA Test) करण्याची मागणी केली आहे. तसेच जर अहवालात बाळ माझ्या भावाचे असल्याचे सिद्ध झाले तर आम्ही बाळाला सांभाळणार असं माध्यमांशी बोलताना राहुल राजपूत म्हणाला. तर प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. शगुन यांनी सांगितले की, नवजात बाळाचे वजन 2.4 किलोग्रॅम होते आणि प्रसूती पूर्णपणे सामान्य झाली. आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मुस्कानची प्रकृती दिवसभर सामान्य राहिली आणि तिच्यावर सतत लक्ष ठेवण्यात आले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ