spot_img

Sarangkheda Horse Vs Bullet Race : बुलेट मागे टाकत वेगवान घोड्याने केला रेकॉर्ड,सारंगखेड्याच्या शर्यतीचा थरार

spot_img

अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!

सारंगखेडा घोडे बाजारात (Sarangkheda Horse Market) एक वेगळाच थरार पाहायला मिळाला. बाजाराचे मुख्य आकर्षण ठरले ते घोडा आणि बुलेट मोटरसायकल यांच्यात घेतलेल्या थरारक शर्यतीचे (Horse Vs Bullet Race). गर्दीने खचाखच भरलेल्या पटांगणात ही अनोखी रेस पाहण्यासाठी हजारो अश्वशौकीनांची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली. शर्यत सुरू होताच अश्व प्रेमींनी प्रचंड जल्लोष झाला. एका बाजूला इंजिनचा गडगडाट आणि दुसऱ्या बाजूला धावणाऱ्या घोड्यांची धमक, अशा वातावरणात ही रोमांचक रेस पार पडली. शेवटी घोड्यांनी आपला नैसर्गिक वेग आणि दमदार ताकद दाखवत बुलेटला मागे टाकत बाजी मारली.वेगाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोड्यांनी या रेसमध्ये पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांचा वेग कोणत्याही यंत्रमानवावर भारी आहे. या शर्यतीत मध्यप्रदेशातील महेश्वर येथील यादव स्टड फार्मची ‘वेगवान राणी’ नावाची घोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या घोडीने बुलेटसोबत रेसिंग ट्रॅकवर दमदार स्पर्धा देत शर्यतीत विशेष कामगिरी केली.

दरम्यान, सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जात आहे. या घोडे बाजारातून दरवर्षी शंभर कोटीची उलाढाल होत असते, यामुळे चेतक फेस्टिवल महाराष्ट्रातला सर्वात मोठा महोत्सव म्हणून प्रसिद्ध होत आहे. सारंगखेडाच्या यात्रेत सर्व प्रकारचे घोडे येत असतात. यात प्रामुख्याने घोड्यांच्या स्पर्धा होत असतात. घोडा हा शुभ लक्षण आहे, यामुळे अनेक शौकीन आपल्या घरासमोर घोडा ठेवत असतात तर आणि घोडे अश्वसंयोगाच्या व्यवसाय देखील होत असतो. या चेतक फेस्टिवलमध्ये 50 हजारापासून तर 11 करोडपर्यंतचे घोडे येत असतात. यामुळे ही यात्रा अश्वशौकीनांसाठी एक पर्वणीच असते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ