spot_img

Sanjay raut : खासदार संजय राऊत यांचा काँग्रेस आणि महायुतीवर हल्लाबोल

spot_img

स्थानिक निवडणुकीपूर्वी राजकीय खेळी तीव्र, राऊतांचा फडणवीसांवरही निशाणा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या (Congress) स्थानिक नेत्यांना खडेबोल सुनावताना महायुतीतील अंतर्गत खलबतांवरही जोरदार टीका केली. काँग्रेसने संविधान, लोकशाही आणि मुंबईच्या रक्षणासाठी एकजुटीने साथ द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी, महायुतीतील मित्रपक्षांना “कोणताही सगा नाही, ज्याला भाजपने फसवला नाही,” असे हिंदी वाक्य सांगत त्यांनी सावध राहण्याचा इशारा दिला. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी याबाबत सूचक विधान केले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचा फॉर्म्युला पुढे येत आहे. दुसरीकडे, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाल्याची चर्चा आहे. शिंदे गटातील शिवसेना आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीतील काही नेते भाजपच्या गोटात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. सोलापूरमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ जोरात सुरू असल्याचा दावा केला जात आहे, तर राष्ट्रवादीने तिथली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. या राजकीय शीतयुद्धावर राऊतांनी अचूक निशाणा साधला.राऊत म्हणाले, “राजकारणात बहुमत ही चंचल गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सध्याचे बहुमत खरे नाही.

देवेंद्र फडणवीसांना (Devendra fadnavis) शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष फोडायचे आहेत. त्याची भूमिगत तयारी सुरू आहे.” फडणवीसांना स्वतंत्रपणे सत्ता हवी असून, त्यासाठी ते कोणतीही खेळी खेळू शकतात, असा टोला राऊतांनी लगावला.2029 पर्यंत मुख्यमंत्रीपद आपल्याच हाती राहील, असा फडणवीसांचा दावा राऊतांनी खोडून काढला. “एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत, पण फडणवीसांनी त्यांच्यावर पाणी फेरले आहे. शिंदे फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची भाषा करत होते, पण दिल्लीच भविष्यात अस्थिर होईल,” असा दावा राऊतांनी केला. “फडणवीसांना मी ओळखतो; ते शिंदेंना कायमचे संपवण्यास समर्थ आहेत,” असा खोचक टोमणा राऊतांनी मारला.या पत्रकार परिषदेत राऊतांनी काँग्रेसला एकजुटीचे आवाहन करताना महायुतीतील अंतर्गत फाटाफुटीवरही बोट ठेवले, ज्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ