spot_img

Sanjay Raut : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उद्धव गटाचा ‘हंबरडा’ मोर्चा, राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघाती हल्ला

spot_img

मराठवाड्यातील पूरपीडितांना न्याय मिळवण्यासाठी संजय राऊतांचा आक्रोशपूर्ण इशारा: ‘धुळफेक पॅकेज बंद करा, अन्यथा दिल्लीपर्यंत पोहोचेल

शेतकऱ्यांचा हाहाकार’छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरे (Uddhav Thacckery) गटाकडून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एक भव्य मोर्चा काढला जाणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा, म्हणून हा मोर्चा आयोजित केला असून, यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप आणि असंतोष स्पष्टपणे व्यक्त होणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटलं की, मोर्चावर कोणतीही टीका करणं म्हणजे शेतकऱ्यांचा अपमानच आहे. हा मोर्चा फक्त स्थानिक पातळीवरच नाही, तर तो दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांचा हाहाकार घेऊन जाईल.राऊत यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची पुष्कळी उदाहरणं मांडली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांची फसवणूक कशी चालू आहे? सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटांना तोंड देताना मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. पॅकेजच्या नावाखाली फक्त धुळफेक केली जातेय.

३१ हजार कोटींच्या घोषणेचं सत्य सांगतो ते फक्त साडेपाच ते सहा हजार कोटींचंच आहे, बाकी सर्व फसवणूक!” त्यांनी पॅकेजच्या खोट्या आकडेवारीवरून सरकारला चांगलंच झोडपलं.मोर्चा प्रचंड मोठा होईल आणि शेतकऱ्यांचा आक्रोश फडणवीसांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “भाजप हा ठेकेदारांचा पक्ष आहे, निगरगट्ट मनाचा आहे. त्यांना शेतकऱ्यांची कधीच चिंता नव्हती. ५० हजार हेक्टर क्षेत्राची नुकसानभरपाईची मागणी आहे, दिली का? कर्जमाफीची मागणी आहे, पूर्ण केली का? आम्ही जिवंत आहोत, तुमच्या छाताडावर बसलो आहोत. म्हणूनच तुम्हाला भिती वाटते.” उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा होईल, असंही त्यांनी सांगितलं.या मोर्चात सहभागी होण्याची तयारी दाखवणाऱ्या MIM च्या प्रस्तावावर राऊत म्हणाले, “आयोजक अंबादास दानवे आहेत. आमचे नेते चंद्रकांत आणि स्थानिक आमदार-खासदार हे मुख्य आयोजक आहेत.” हा मोर्चा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यात संपूर्ण राज्यातील शेतकरी एकत्र येत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ