spot_img

Sanjay Raut : १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिकेत ‘शतक’ पार करण्याचा संजय राऊतांचा दावा

spot_img

राज–उद्धव युतीनंतर ११५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आत्मविश्वास; फडणवीसांच्या टीकेला राऊतांचे जोरदार प्रत्युत्तर

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची युती जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील ६७ प्रभागांमध्ये त्यांच्या ताकदीत मोठी भर पडल्याचं बोललं जात आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट विजयाचा आकडाच जाहीर केला.

“६७ कशाला? आम्ही याक्षणीच ११५ जागा जिंकत आहोत. बहुमताचा आकडा सहज पार होईल. शिवसेना आणि मनसे मिळून ११७ ते १२० जागांपर्यंत मजल मारतील,” असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेवर ठाकरे यांचाच झेंडा फडकेल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात रशीद मामू यांच्या प्रवेशावरून वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही टीका करत मतांसाठी लांगूलचालन होत असल्याचा आरोप केला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला.

“निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही अजित पवार, अशोक चव्हाणांसह भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांच्या संगतीला जाता, ते काय? ज्यांना पंतप्रधानांनी भ्रष्टाचारी ठरवलं, त्यांच्याशी हातमिळवणी कोण करतोय?” असा सवाल उपस्थित करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. हे सगळे एकाच माळेतले मणी असल्याचं म्हणत त्यांनी आरोप अधिक तीव्र केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ