Sanjay Raut : अजितदादांच्या अपघाती मृत्यूच्या एफआयआरसाठी संजय राऊतांचे भाजपला ‘ओपन चॅलेंज’

spot_img

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी आधी गुन्हा दाखल करा, ‘कर नाही तर डर कशाला?’ असे म्हणत राऊतांनी सरकारला घेरले

बारामतीचे माजी आमदार अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत व्ही. के. सिंग यांच्या अटकेची आणि विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. याच मुद्द्यावरून आता संजय राऊत यांनी मैदानात उतरत सत्ताधारी भाजप आणि मिंधे सरकारवर कडाडून टीका केली आहे. “जर मुख्यमंत्री म्हणतात की हा मृत्यू चटका लावणारा आहे आणि आम्ही खोलवर तपास करू, तर मग एफआयआर नोंदवायला सरकार का घाबरत आहे?” असा सडेतोड सवाल राऊतांनी उपस्थित केला. कर्नाटकात ‘झिरो एफआयआर’ झालेला असताना महाराष्ट्रात टाळाटाळ का होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दुसरीकडे, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत गुन्ह्याची मागणी केली आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, ही मागणी वास्तविक पाहता सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवारांनी करायला हवी होती, मात्र ती रोहित पवार आणि विरोधक करत आहेत. दरम्यान, पार्थ पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतल्याबद्दल राऊतांनी त्यांचे अभिनंदन केले, पण त्यांना आपल्या आजोबांच्या (शरद पवार) आदर्शावर चालण्याचा सल्लाही दिला. बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी, ‘अजितदादांच्या मृत्यूचे गूढ’ हाच आता या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ