Sanjay Raut : ४० आमदारांच्या तीर्थपानावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

spot_img

भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळिकीचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रुपाली चाकणकर यांना आधी महिला आयोग आणि आता राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले आहे. मात्र, या राजीनाम्यानंतर राजकारण अधिकच तापले असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाला थेट ‘मंत्रिमंडळाच्या दारात’ नेऊन ठेवले आहे. खरात बाबाकडे जाणारे चाकणकर या एकमेव नेत्या नव्हत्या, तर सरकारमधील ४० आमदार आणि अनेक बडे मंत्री त्याच्या दरबारी हजेरी लावत होते, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.

राऊतांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले असून, खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे आणि त्याच्या पायाचे ‘तीर्थ’ प्राशन करणारे ते ४० आमदार नेमके कोण आहेत, याची नावे जाहीर करण्याची मागणी केली आहे. “या भोंदू बाबाला जणू सरकारनेच राजमान्यता दिली होती,” असा टोला लगावत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले. दुसरीकडे, नरहरी झिरवळ आणि किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ प्रकरणावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “विरोधक असते तर आधी फाशी आणि मग चौकशी झाली असती, पण स्वतःचे लोक आले की फक्त चौकशीचे गाजर दाखवले जाते,” असे म्हणत राऊतांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ