spot_img

Sanjay Raut : महापौर पदावरून संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

spot_img

“महापौर शोभेचं पद, खरा खेळ पैशांचा” राऊतांचा महायुतीवर आरोप

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत महापौर पदाच्या राजकारणावर बोट ठेवले आहे. महापौर पदाला फारसे अधिकार नसून ते केवळ शोभेचे पद असल्याचे सांगत, स्थायी समितीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच सत्ताधारी मंडळींची धडपड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तिथे आर्थिक व्यवहार होतात, म्हणूनच सौदेबाजी आणि दबावाचे राजकारण चालते, असा दावा राऊतांनी केला.

केडीएमसीतील दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची कबुली देत त्यांनी सांगितले की, याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तसेच पक्षांतरावर भाष्य करताना, विश्वासाने उमेदवारी दिलेल्या लोकांनीच पाठीत खंजीर खुपसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिंदे गटाने शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांबाबत केलेल्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला.

भाजपवर टीका करत राऊत म्हणाले की, त्यांच्या नगरसेवकांवरही लक्ष ठेवले जात असून हालचालींवर नजर ठेवण्यासाठी फोन टॅपिंगसारख्या पद्धती वापरल्या जात आहेत. मुंबईचा महापौर कोण होणार, हे दिल्लीतून ठरवले जात असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी केंद्राकडून हस्तक्षेप होत असल्याचा दावा केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ