spot_img

Sanjay Raut on Ujjawal Nikam : ‘कसाबच्या बिर्याणीनेच निकम यांना खासदार केले’; संजय राऊतांचा पुस्तकातून खळबळजनक दावा

spot_img

‘भाजपला आयते कोलीत मिळाले’; ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातून उज्ज्वल निकम यांच्यावर बोचरी टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या नव्या पुस्तकातून २६/११ चा दहशतवादी अजमल कसाब आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात खळबळजनक खुलासे केले आहेत. “कसाबला जेलमध्ये बिर्याणी दिली जायची” हे निकम यांचे गाजलेले विधान पूर्णपणे बनावट होते आणि केवळ राजकीय फायद्यासाठी ते करण्यात आले होते, असा थेट आरोप राऊतांनी केला आहे. या एका विधानामुळे तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची प्रचंड बदनामी झाली आणि भाजपला ‘हिंदुत्वाचे’ राजकारण करण्यासाठी मोठे हत्यार मिळाले, असे राऊतांनी पुस्तकात नमूद केले आहे.

राऊत यांच्या दाव्यानुसार, आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आयटीबीपी (ITBP) जवानांनी कसाबला कधीही सवलत दिली नव्हती, उलट त्याला कडक शिस्तीत ठेवले होते. मात्र, निकम यांनी जाणीवपूर्वक ‘बिर्याणी’चे कथानक रचले, ज्याचा वापर भाजपने दोनदा राजकीय फायद्यासाठी केला. २०१४ आणि त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये या मुद्द्यावरून विरोधकांना झोडपून काढण्यात आले. विशेष म्हणजे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने निकम यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. आता त्यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाली असून, या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी ते ‘बिर्याणी’चे असत्य विधानच होते, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ