spot_img

Sanjay Raut : राज्यसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’चा कसब; सातवी जागा जिंकण्यासाठी विरोधकांची वज्रमुठ!

spot_img

संजय राऊतांचा भाजपला इशारा; एपस्टीन फाईल्सवरून पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा

राज्यसभेच्या सातव्या जागेवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, महाविकास आघाडीमध्ये (मविआ) जागावाटपाबाबत खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आघाडीची भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले की, “ही जागा ताकदीने निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहणे ही काळाची गरज आहे.” सध्या विधिमंडळात शिवसेनेचे २०, काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) १० आमदार आहेत. ही संख्याबळाची गणिते पाहता, कोणताही एक पक्ष परस्पर निर्णय घेऊ शकत नाही. उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात सविस्तर चर्चा झाली असून, आज संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडी आपला संयुक्त निर्णय जाहीर करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर टीका करताना राऊत यांनी ‘शिष्टाचार’ जपण्याचा सल्ला दिला. एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाची हत्या झाल्यावर शोक व्यक्त करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानातील नेत्यांच्या मृत्यूनंतरही भारताने दुःख व्यक्त केले होते; मात्र सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान आंतरराष्ट्रीय शिष्टाचार पाळण्यात अपयशी ठरत असून आपले परराष्ट्र धोरण ‘माती खात’ असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींच्या दोन फाईल्स बाहेर काढण्याच्या दिलेल्या इशाऱ्याचे राऊतांनी समर्थन केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वप्रथम ‘एपस्टीन फाईल्स’चा उल्लेख केला होता, याची आठवण करून देताना राऊत म्हणाले की, या फाईल्समधील धक्कादायक माहितीवरून जगाचे लक्ष भरकटवण्यासाठीच अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण केली जात आहे. एपस्टीन फाईल्समध्ये काही बड्या नेत्यांची नावे असण्याची शक्यता असून, त्यातून सरकार अडचणीत येऊ शकते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ