Sanjay Raut : मुंबई महापालिका निवडणुकीआधी युतीवरून चर्चांना उधाण; शरद पवार गटाबाबत संजय राऊतांचे स्पष्ट संकेत

spot_img

जागा वाटप झाले म्हणजे युती झालीच” – संजय राऊतांचे सूचक विधान, वंचित–काँग्रेस युतीचेही स्वागत

महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्ष रणनिती आखण्यात गुंतले आहेत. युती आणि आघाड्यांबाबत रोज नवे संकेत मिळत असतानाच ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार गटासोबत युतीची औपचारिक घोषणा कधी होणार, असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, युतीसाठी घोषणा आवश्यक नसते. जागा वाटप झाले आहे, म्हणजे युती प्रत्यक्षात अस्तित्वात आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमधील युतीचेही स्वागत केले. “ते आमच्यासोबत आले नाहीत तरी चालेल, पण जर त्यांचा सहभाग भाजपला रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार असेल, तर आम्हाला त्याचा आनंदच आहे,” असे राऊत म्हणाले.

युती करताना काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असते, हे मान्य करत राऊत म्हणाले की, जागांची देवाणघेवाण झाली की काही इच्छुक नाराज होतातच. हा प्रकार सर्वच पक्षांत घडतो. मात्र, कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यास ते नेतृत्वाचा निर्णय स्वीकारतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बंडखोरीच्या आरोपांवर बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका केली. “प्रत्येक वेगळा निर्णय म्हणजे बंड नव्हे. बंडाची व्याख्या समजून घ्यावी लागेल,” असे सांगत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

शरद पवार गटासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, “आम्ही आमच्याकडील बहुसंख्य जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्या आहेत. काही जागा मनसेच्या वाट्याला गेल्या असतील, तर त्या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास आम्ही त्यांना सांगितले आहे. आमच्याकडून हा विषय संपलेला आहे.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ