spot_img

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची झाली भेट !

spot_img

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या प्रकृतीची केली विचारपूस.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाल्याचे समोर आले आहे. मुंबई मधल्या एका खासगी सोहळ्यामध्ये म्हणजेच संजय राऊतांचे (Sanjay Raut) व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्न समारंभात त्याची भेट झाली होती. त्याच बरोबर तिथे आशिष शेलार सुद्धा उपस्थित होते. या भेटी दरम्यान फडणवीसांनी संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजार झाला होता. हे त्यांनी हॉस्पिटलमध्ये असताना ट्विट करून सांगितलं होते. आणि एक फोटो पोस्ट केला होता. ज्या फोटोमध्ये हाताला सलाईन देखील लावलेली दिसली. डॉक्टरांनी त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. आजारावर उपचारासाठी त्यांनी काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहायचे ठरवले होते. आणि लवकरच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार झाला. म्हणून त्यांनी लग्न सोहळ्याला आपली उपस्थिती दाखवली. त्या सोहळ्यात उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांच्याशी भेट झाली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी भांडूप येथील निवासस्थानी भेट देत प्रकृतीचा आढावा घेतला होता. “राऊत यांची तब्येत सुधारत असून ते लवकरच पुन्हा राजकीय कामात सक्रिय होतील,” असे ठाकरे यांनी तेव्हा सांगितले होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ