spot_img

Sanjay Kenekar : दुबईत अडकलेल्या भारतीयांसाठी संजय केणेकरांचा पुढाकार;मदतीचे दिले आश्वासन

spot_img

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्यांनंतर शेकडो भारतीय प्रवासी दुबईत अडकले आहेत. विमाने रद्द झाल्यामुळे आणि तणावाच्या वातावरणामुळे अनेक पर्यटकांना मायदेशी परतणे कठीण झाले आहे.

भाजप आमदार संजय केणेकर यांनी दुबईमध्ये अडकलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील काही भारतीय नागरिकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. संबंधितांना भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकारकडून तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पर्यटकांना आर्थिक कारणांमुळे थांबवू नये, अशा सूचना हॉटेल व्यवस्थापनाला दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटकांना केवळ आर्थिक कारणांमुळे थांबवू नये, अशा स्पष्ट सूचना हॉटेल व्यवस्थापनाला दिल्याचेही केणेकर यांनी सांगितले. अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ